मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?....
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना,
पण माझ्यासाठी,
दोन अश्रु गाळशील का?
जन्मभराची साथ,
नाही मिळाली तरी चालेल;
पण माझ्या शवयात्रेत,
तू दोन पावलं चालशील का?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
माझ्यासाठी तू,
कोमेजली नाहीसच कधी;
शेवटी माझ्यावर,
तू दोन फुलं उधळशील का?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
विचार करायला,
उसंत मिळाली तर्;
माझ्या आठवणी कधी,
उराशी कवटाळशील का?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
माझ्या नावाचं मंगळसुत्र,
तिन नाही घातलं तरी;
माझ्यासाठी एक दिवस,
ती वैधव्य पालेल का ?
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....
मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?...
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...