Click Here

प्रेमात पडल की असच होणार...

दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार..
स्वप्नात सुध्दा आपल्या तिच व्यापुन उरणार,
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार...

डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्न नवी दिसणार.
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चांदणे सांडणार,
एश्वर्याचा चेहरा सुद्धा पण,
तिच्या पुढे फिका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार...

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,
मित्रांसमोर मात्र बेफिकीरी दाखवणार,
न राहवुन शेवटी आपनच फोन लावणार,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार...

नि तिच्या आपला भरुन जाणार,
तिच्या छाया पण आपण जपुन ठेवणार
प्रत्येक पहिला तिलाच होणार,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार...

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...