Click Here

१८ मार्च, २०१०

तुझा स्पर्श


तुझा स्पर्श

तुझा स्पर्श अंगावर शहारे उठवुन गेला,
तुझ्या गालावरची खळी, माझ्या प्रेमाने फुलवुन गेला,

मोहरले अंग सारे, तुझ्या प्रेमात पडुन,
ओठावर तुझ्या नावाचे, शब्द भिजवुन गेला,

तुझ्या स्पर्शात मी, अनेक स्वप्न पाह्त राहिलो,
त्या स्वप्नात तुला, तो छान सजवुन गेला,

पावसाच्या सरी जनु, तुलाच बघुन बरसल्या,
आपल्या प्रेमात पाऊसही, शहारण्यासारखा थांबून गेला,

भिजुन अंग सारे, तुला दिले हातातहात,
तुझ्या स्पर्शात दुखः सारे, मनापासुन विरुन गेला,

डोळ्यात वाटलेले, मुक्या भावनाचे शब्द,
स्वासातून अंगभर, काळजात भिडवून गेला,

अन स्वासही मुक्याने, मंदार्यात उधळीत प्रेम,
त्या स्पर्शात मला, क्षणभर स्वर्ग दाखवून गेला...

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...