Click Here

आयुष्य खूप सुंदर आहे....

आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका, वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!

मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून ..... आयुष्य खूप सुंदर आहे,

सोबत कुणी नसल तरी एकट्यानेच ते फुलवत रहा......
ठरवलं ना एकदा मागे वळुन पुन्हा, आता नाही बघायचं...
विसरलेल्या आठवणींना, आता नाही आठवायचं...
चुकार हळव्या क्षणात, आता नाही फसायचं...
अपेक्षांचे ओझे आता, मनावर नाही बाळगायच....
नागमोडी वळणावर आता, नाही जास्त रेंगाळायचं...
निसरड्या वाटेवर आता, नाही आपण घसरायचं...
स्वतःच्या हाताने आता, स्वतःला सावरायचं...
नी स्वतःचे आयुष्य, स्वतःच आपण घडवायचं....

लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...