Click Here

१४ मार्च, २०१०

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी पुरतं वडं करतं

पण त्यामागे धावलं तर आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं की हळुच खांध्यावर बसतं !!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभार...