माझ प्रेम
तुझे फोटो परत पाठवत आहे. मी फोटो परत करतोय याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर रागावलो आहे, नाराज आहे किंवा यापुढे तुझ्याशी मैत्री ठेवणार नाही. खरंतर तुझ्यावर रागावणे मला कधीच जमलं नाही.
या फोटोंवर माझा आता काहीच ह्क्क नाही. फोटो तुला परत करतोय आणि आठवणी माझ्याजवळ ठेवत आहे, त्या फक्त माझ्याच आहेत. जेव्हा जेव्हा तुझी आठवण
यायची, तुला पहायची अतोनात इच्छा व्हायची, तेव्हा मी कित्येक वेळ तुझे फोटो पाहत रहायचो पण..........!
तु नाहीस तीथे तुझ्याबद्द्ल विचार करण्यात काय अर्थ आहे
कारण जीथे तू नाहीस तिथे सारंच व्यर्थ आहे.....!
तु तुझ्या मनाला कोणतीच गोष्ट लावुन घेवु नकोस, कारण नशिबाचा भाग फार वेगळा आहे आणि मला त्याची चांगलीच कल्पना आहे. शेवटी एक गोष्ट मात्र खरी
मला माहीत आहे तु माझी केव्हाच होणार नाहीस
तरीसुद्धा असेच कधी कधी माझ्या मनात विचार येतील. Read more...